कोटेचा महिला महाविद्यालयात कला वांग्मय आणि अभ्यास मंडळाचे उद्घाटन.

भुसावळ: येथील श्रीमती पदमबाई कपूरचंद कोटेचा महिला महाविद्यालयात आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी कला वांगमय आणि अभ्यास मंडळाचे उद्घाटन भुसावळ येथील समाजसेविका आणि समुपदेशिका सौ आरती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी सौ. आरती चौधरी यांनी विद्यार्थिनींना भावनिक नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले ,यावेळी त्यांनी असे सांगितले की आधुनिक युगामध्ये प्रत्येकाला काही न काही टेन्शन, समस्या असतात. अशा समस्या आपण मनात न ठेवता आपले आई वडील किंवा मित्र मैत्रीण यांना सांगितल्यास समस्या वाढत नाही. तसेच भावनेच्या आहारी न जाता भावना आणि बुद्धी यांचा समन्वय ठेवून रागावर नियंत्रण ठेवून कोणताही निर्णय घेतला पाहिजे .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास पाटील यांनी सुद्धा विद्यार्थिनींना आपल्या मनातील भावना कोणाशी तरी शेअर करून जीवनात हसत राहिलं पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी एक विनोदी कविता वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली, कार्यक्रमा चे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत परिचय समिती प्रमुख प्रा. डॉ. शरद अग्रवाल यांनी केले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. वाय .बी .ए या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी भूमिका पाटील हिने केले .आभार प्रदर्शन प्रा. कु. अनुरीता दिलवालिया हिने केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू , भगिनी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.