बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत सापडले ; मृत्यूचे कारण गूढ…?

चंद्रपूर/

महाराष्ट्रात चंद्रपूर व गडचिरोली येथे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागात गुरुवार ७ सप्टेंबर रोजी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या आहेत.
राज्याचे वन मंत्री ना.मुनगंटीवार हे असून या जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.
बछडयांचा मृत्यू कशामुळे झाला ? कोणी शिकार तर केली नाही ना .. ? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वन विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने निरीक्षण करत असून शोध घेत आहे. वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक ५७२ मध्ये त्यांना अपंग वाघाचे बछडे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले.
त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर जवानांना वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सविस्तर पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता.
दरम्यान या दोन बछड्याची चर्चा होत आहे.