गोविंदा आला रे आला..जळगावच्या काव्य रत्नावली चौक

जळगाव –
जळगाव येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.
दहीहंडी महोत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे. यासाठी एनसीसी, नूतन मराठा महाविद्यालय, ॲङ बाहेती महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल मूळजी जेठा महाविद्यालय हे पाच पथक दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके होणार आहेत.

यासह शिवतांडव व शैर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे 275 ढोलताशा वादक आपल्या कलेची प्रस्तुती देणार आहेत. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात 20 विद्यार्थी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत. अनुभूती शाळा, जी.एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस्‌‍‍ गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य प्रस्तुत केले जाणार आहे. 5 ते 12 वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.