इस्कॉन भुसावळ तर्फे श्री कृष्ण जन्मोस्तव साजरा : जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – इस्कॉन भुसावळ तर्फे श्री कृष्ण जन्मोस्तव मोठ्या भक्तीने व श्रद्धेने विधीवतरित्या साजरा करण्यात आला प्रसंगी उपस्थित भक्तांना भक्तीमय भजन कीर्तनाचा लाभ घेतला .

6 सप्टेंबर रोजी कमल गणपती हॉल मधे इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष श्रीमान रासयात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ते 7 हजारांच्या उपस्थित सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला..

या उत्सवात भगवान श्री राधा कृष्ण यांच्या विग्रह मूर्तीला 25 विविध नैसर्गिक फळ, सुगंधित फुलांचा अभिषेक करण्यात आला .

गोपाल फन स्कूल इस्कॉन भुसावळ व पोद्दार स्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी विविध कृष्ण लीला व नृत्य यांचे सुन्दर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले,

कृष्ण कथा वर श्रीमान रास यात्रा प्रभु यांचे मन मोहक प्रवचन झाले, सर्व भावीकांसाठी सुमधुर कीर्तन झाले, सर्व भाविकांनी यामधे तल्लीन होऊन नृत्य केले

सर्व उपस्थित भावीकांनी स्वादिष्ट कृष्ण प्रसादा चा भरपूर आस्वादन केले

या विशेष महा महोत्सवा साठी मंदिराचे भक्त व सर्व मंदिराचे व्यवस्थापन भक्त वृंद व समस्त कार्यकारी भक्त वृंद यांनी विशेष सहकार्य लाभले.