अंतर्नाद’च्या शाडूची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेला ३१० गणेशप्रेमींचा उस्फुर्त सहभाग : चिमुकल्या हातांनी साकारल्या आकर्षक श्री मुर्ती :

प्रतिनिधी I भुसावळ

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा निशुल्क कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. यंदा उपक्रमाचे तिसरे वर्ष होते.या कार्यशाळेत भुसावळ परिसरातील ३१० पर्यावरणप्रेमी गणेशभक्त विदयार्थ्यानी सहभाग घेतला.जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नेत्ररोग तज्ञ डॉ.नि.तु.पाटील, प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे उपस्थित होते.कार्यशाळेेचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे यांनी तर सूत्रसंचालन जीवन महाजन आणि आभार समन्वयक तेजेंद्र महाजन यांनी केले .

४ ते १५ वर्षे वयाेगटाचे ३१० विदयार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. मूर्ती कला प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे सर यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले आणि मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर करून विदयार्थ्यांशी संवाद साधला. अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेत आकर्षक गणरायाच्या मूर्ती साकारल्या.

प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, प्रकल्प समन्वयक तेजेंद्र महाजन, सह समन्वयक भूषण झोपे यांनी आयाेजन, नियाेजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य योगेश इंगळे, प्रदिप सोनवणे, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, ज्ञानेश्वर घुले, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, ललित महाजन, सचिन पाटील, अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.विदयार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमाचे नवे व्यासपीठ
पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याची चळवळ या माध्यमातून उभी राहील. कार्यशाळेला जाे उदंड प्रतिसाद मिळाला ताे उत्साह वाढवणारा आहे, असे प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे म्हणाले.

मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार
शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा आनंद शब्दातीत असताे. या मूर्तीचे विसर्जन पाण्यात लवकर हाेते. अर्थात, उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहते. मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अंतर्नादच्या या कार्यशाळेच्या मोठा हातभार लागणार असून हे नक्कीच कौतुकास्पद असे कार्य आहे असे गाैरवाेद्गार प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी काढले.

आदर्श उपक्रम
मोबाईल आणि टीव्हीच्या काळात अश्या कार्यशाळांच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा नक्कीच विकास होइल आणि सोबतच पर्यावरण रक्षणालाही हातभार लागेल.अतर्नादचा हा उपक्रम नक्कीच आदर्श असा उपक्रम आहे अश्या भावना युवराज लोणारी यांनी व्यक्त केल्या.