भाऊ बहिणीच्या प्रेमाची परंपरा : माजी उपनगराध्यक्ष शेख शफी यांनी साजरा केला रक्षाबंधन :

भुसावळ – जातीय सलोखा राखत भाऊ बहिणीच्या प्रेमाची परंपरा रक्षा बंधन व भाऊबीज न चुकता दरवर्षी शहराचे माजी उपनगराध्यक्ष शफी पहलवान जपून आहेत .
दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचेकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला
यावेळी मानलेली बहीण सौ. नंदाताईंची नुकतीच राष्ट्रवादी सामाजिक न्याय जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत त्यांच्या रक्षणासाठी ग्वाही दिली . .