वरणगाव – भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील शेतकरी विजेच्या लंपनडावाने त्रस्त झाल्याने उपकेंद्राच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले तर अभियंत्याच्या लेखी अश्वासाना नंतर आंदोलन मागे

पावसाळ्यात मुबलक पाऊस नसल्याने खरीपाचे पिके पाण्या शिवाय वाढवायची कशी या चिंतेने शेतकरी विहिरीच्या पाण्यावर कशीबशी शेती कसत आहेत मात्र शेती पंप सुरू करण्यासाठी अंखडीत विज पुरवठा पाहीजे तसे शासनाने शेती साठी किमान आठ तास विज पुरवठा देण्याचे नियोजन केले आहे मात्र भुसावळ तालुक्यातील विल्हाळे उपविज केद्रावर या नियोजनाला फाटा देत शेतकऱ्याना कोणतीच पुर्व सुचना न देता शेती शिवरातीचा विज पुरवठा खंडीत केला जात आहे या वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने विल्हाळे परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असल्याने अखेर विज उपकेंद्रा समोरच सर्व शेतकरी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले सकाळी सात वाजे पासून सुरु झालेल्या या आदोलन स्थळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटील , तालुकाध्यक्ष दिपक मराठे , योगेश पाटील व इतर पदाधिकारी यांनी अधिकारी आदोलन स्थळी उपस्थीत होताच त्यांना गजार गवत देऊन त्यांचे स्वागत करीत अवेळी विज पुरवठा खंडीत का करता , अपातकालीन भर नियमन बंद करा , ३ फेज व्यतीरीक्त सिंगल फेज गावाठण ला विज द्या! विज उपकेद्रावरील फोन तत्काळ सुरु करा अशा मागण्या शेतकऱ्यानी आक्रमक पणे यावेळी अभियंत्यांना केल्याने भुसावळ विभागाचे कार्यकारी अभियता यांनी लेखी अश्वासन देत आपल्या मागण्या वरिष्ठाकडे पाठवून त्यावर लवकर उपाय योजना करून सिंगल फेज देण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून मजुरी साठी पाठवणार असल्याचे अश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानी आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी विल्हाळे , शिदी येथील शेतकरी मोठ्या सख्येने उपस्थीत होते
मात्र काही ना काही कारणाने विज पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांना वेठीस विज कंपणी धरत असल्याच्या निषेर्धात येथील शेतकऱ्यांनी उपकेंद्रा समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे


