रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यातर्फे वृक्षारोपन

भुसावळ -रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्यातर्फे 29 ऑगस्ट 2023 रोजी 25 वृक्ष लावून चांगला उपक्रम करण्यात आला ,काशी विश्वेश्वर मंदिर देना नगर येथे नवीन गणपती चे मंदिर उभारण्यात आले त्यानिमित्ताने आज भंडारा आयोजित करण्यात आला होता याचं अवचित्य साधून रोटरी क्लब भुसावळ , परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहे, विशेषता वड, पिंपळ उंबर, आंबा, नीम,कार्यक्रमास रोटरी क्लब भुसावळ चे अध्यक्ष विकास कात्यायनी यांच्यातर्फे वृक्ष लावण्यात आले तसेच काशी विश्वेश्वर मंदिर चे ट्रस्टी दिलीप खंडेलवाल, श्याम साळी, गजानन पवार, सुरवाडे आणि इतर परिसरातील लोकांनी वृक्ष लागवड केली,रोटरी क्लब तर्फे नाईक, गजानन ठाकूर, गोपाळ तिवारी, मदन बोरकर, महेश भराडे, राजेश अग्रवाल, सारंग चौधरी, प्रकाश ठाकूर उपस्थित होते, भुसावळ मध्ये वृक्ष लागवडीसाठी जे अपार मेहनत घेत आहे असे नाना पाटील यांच्या हस्ते पण वृक्ष लावण्यात आले, परिसरातील अनेक ज्येष्ठ, तरुण व्यक्ती उपस्थित होते.नंतर महाप्रसाद देण्यात आले.