भुसावळ, ता. ३० : म्हणालेकोणतेही चांगले काम करण्यासाठी चांगली थीम व ती राबविणारी चांगली टिम लागते. म्हणून समाजसेवेसाठी वेळेचे सत्पात्री दान आवश्यक आहे. असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे सरकार्यवाह स्वानंद झारे यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या दायित्व ग्रहण समारंभात ते बोलत होते.
यावेळी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे, शाखा पालक डॉ निलिमा नेहेते, मावळते अध्यक्ष विलास फालक, सचिव भुषण वाणी व्यासपीठावर उपस्थित होते.
झारे पुढे म्हणाले की जागतिकीकरणाच्या काळात कुटूंब व्यवस्था डळमळीत झाली आहे. ती सक्षम होणे आवश्यक आहे. संपूर्ण कुटूंबाचा वेळेनुसार सामाजिक कामात सहभाग असावा. भुसावळला सर्व प्रांताचे लोक राहतात. येथे राष्ट्रीय विचारांच्या उभारणीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. येथे ओलावा अजुनही टिकुन असल्याने सामाजिक वातावरण चांगले आहे. त्यामुळे समाजसेवेसाठी चांगली संधी आहे. असे झारे म्हणाले.
यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून सतिश खडायते, सचिव हरीष कोल्हे, कोषाध्यक्ष गौरव हिंगवे तर महिला संयोजिका राधा चव्हाण यांची निवड करण्यात आली. आली,
मावळते अध्यक्ष विलास फालक यांनी आपल्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला.प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना व कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना
दायित्व ग्रहणाची शपथ दिली. संपूर्ण वंदे मातरम दीपिका हिंगवे यांनी सादर केले. शाखा पालक डॉ. निलीमा नेहेते यांनी प्रास्ताविक केले.
उज्वल सराफ यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार हरीष कोल्हे यांनी मानले. नुतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे–
शाखा पालक-डॉ.सौ.निलिमा नेहेते.
अध्यक्ष-श्री सतीश खडायते. उपाध्यक्ष (संस्कार )-डॉ.सौ. मनीषा दावलभक्त.
उपाध्यक्ष (सेवा )-श्री श्याम दरगड.
उपाध्यक्ष (महिला व बालकल्याण)-डॉ.सौ.अर्चना खानापूरकर.
उपाध्यक्ष (संपर्क)- कपिल मेहता.
सचिव-श्री हरीश कोल्हे.
कोषाध्यक्ष- गौरव हिंगवे. महिला समन्वयक- राधा चव्हाण.
संघटन सचिव- भूषण वाणी. संपर्क प्रमुख- भूषण वैद्य.
प्रसिद्धी प्रमुख- श्रीकांत जोशी.
शहर संयोजक- आनंद फडके.
सेवा प्रमुख – राजेश लड्ढा.
संस्कार प्रमुख – कुणाल महाजन, प्रा. गिरीष कुलकर्णी
कार्यकारणी सदस्य -रुपेश जैन, संजय चौधरी, सुजित भोळे, तेजस महाजन, उज्वल सराफ, योगिता वायकोळे
निमंत्रित सदस्य – विलास फालक योगेश मांडे
कार्यक्रमाला प्रभाकर हॉलचे संचालक चेतन पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास किशोर शिंपी, गोटू भाऊ लाहोटी, विजय जोशी, विशाल अग्रवाल,रमाकांत भालेराव, अनंत भिडे सुनील इंगळे व गायत्री मंदिर संस्था यांचे सहकार्य लाभले.

—


