जळगाव –

बदलते युग व गरजानुसार शैक्षणिक धोरण देखील बदलत आहे पारंपारिक शिक्षणातून बाहेर पडत स्किल बेस शिक्षणावर भर दिला जात आहे हे शिक्षण घेत असताना पायाभूत गोष्टी शिकणे गरजेचे आहे हे शिक्षण घेत असताना त्याला कंटाळवाणे न करता प्रात्यक्षिकातून आनंददायी व संकल्पना स्पष्ट होणारे शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणात आहे यामध्ये प्रत्येक पातळीवरील विद्यार्थ्यांचा विचार केला गेला आहे तसेच शिक्षणाचे टप्पे देखील बदलून आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घेता येणार आहे पाठांतराची सवय मोडत कृतीतून शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ चंद्रमौली जोशी यांनी केले
बेंडाळे महाविद्यालयातील सभागृहामध्ये जिल्ह्यातील क्रियाशील 50 गणित शिक्षकांचे एक दिवसाचे नवीन शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव, शिक्षण विभाग जळगाव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावरील गणित कार्यशाळेचे आयोजन जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयातील सभागृहात करण्यात आले होते
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे ज्येष्ठ अधिव्याख्याता सी डी साळुंखे, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, डॉ. पी एस कोळी, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुनील वानखेडे आदी उपस्थित होते
विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉ. चंद्रमौलीजोशी यांनी वही पेन न घेता भूमितीतील विविध भौमितिक आकार त्याचे गुणधर्म व संकल्पना प्रात्यक्षिकातून साहित्याच्या साहाय्याने स्पष्ट करून दाखविले तसेच पटांगणावर अथवा बगीच्या मध्ये खेळता खेळता दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्यांचे गुणाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, नैसर्गिक, सम, विषम संख्यांची बेरीज, तसेच विविध गणितातील क्रिया सोप्या व सरळ पद्धतीने कसे करता येईल याविषयीचे प्रशिक्षण दिवसभर घेऊन विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करता येऊ शकते याबाबतची माहिती दिली नवीन शैक्षणिक धोरणातील विविध तरतुदी याविषयांची माहिती दिली तसेच रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन च्या वतीने 40 ऍक्टिव्हिटी करता येतील असे गणितीय किट भेट दिले
ज्येष्ठ अधिव्याख्याता सीडी साळुंखे म्हणाले की शिक्षकांनी अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध संकल्पना वापरल्या पाहिजेत तसेच हसत खेळत शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढवली पाहिजे तसेच शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेत देखील सहभागी व्हा यामुळे नवनवीन साहित्य तयार होईल. तर उपशिक्षणाधिकारी एजाज शेख म्हणाले की शिक्षण विभाग जळगाव यांच्या वतीने नेहमीच शैक्षणिक धोरणातील होणारे बदल व करावयाचे कार्यवाही यावर कार्यशाळा घेतल्या जातात वर्षभर विज्ञान व गणिताच्या उपक्रमांची आखणी करून तालुका व जिल्हास्तरावर पूर्ण केले जात असतात याचा लाभ शिक्षकांनी घ्यावा
शिक्षकांचा अभ्यास दौरा
नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करता यावी यासाठी ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग ही संकल्पना शिक्षकांना समजावून घेण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील विज्ञान व गणिताच्या शिक्षकांचे मुंबईतील होमि भाभा सायन्स सेंटर येथे अभ्यास दौरा काढून या ठिकाणी दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे यामुळे शिक्षकांना देखील आपल्यातील उणिवा शोधून नवीन बदल स्वीकारण्यास मदत होणार आहे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञानाची भीती आहे ही भीती दूर करण्यासाठी ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग ही संकल्पना महत्त्वाची आहे विद्यार्थी त्या ऍक्टिव्हिटी व घटनेमागील कारण मीमासा करतात त्यांना आवड निर्माण होते व स्वतः ऍक्टिव्हिटी करू शकतात व अभ्यासाकडे आकर्षित होतात होमवर्क न देताच आनंददायी शिक्षणावर ती या धोरणात तरतूद आहे
डॉ. अनिल झोपे प्राचार्य
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता अग्रवाल यांनी तर आभार बी आर महाजन यांनी मानले


