जळगाव –
गावठी हातभट्टीवाल्याचे समुळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात ठीक ठिकाणी धडक कारवाई केल्याने हातभट्टी चालक व विक्रेत्या मध्ये खळबळ उडाली आहे .

जळगाव जिल्ह्यात ठीक ठिकाणी गावठी हात भट्टीची दारू तयार करुन त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूक यांना मिळाली होती. त्यामुळे दोघं विभागाने आप-आपल्या अधिकारी व अंमलदार व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात धडक कारवाई करून लाखो लिटर दारू नष्ट करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावठी हात भट्टीच्या दारुमुळे जिल्हयांतील तरुण मुले व्यसनाधीन होत असल्याने जळगाव जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच दिनांक १८ ऑगस्ट रोजी संयुक्तीकरित्या जिल्ह्यात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत जळगाव पोलीस दलाने विविध पोलीस स्टेशनला एकूण ६५ कारवाई करुन एकूण ३ लाख ९६ हजार ८५ रुपयांचे २५ हजार २५६ लिटर कच्चे रसायन व ७७२ लिटर तयार गावठी हात भट्टीची दारु नष्ट केली. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हयांत एकूण २० ठिकाणी कारवाई करुन एकूण १ लाख ३६ हजार ८०० रुपयांचे १५ हजार २५० लिटरचे कच्चे रसायन व ४४० लिटर तयार गावठी हात भट्टीची दारु नष्ट केली.
जळगाव पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क, जळगाव अशांनी संयुक्तीकरित्या एकूण ८५ ठिकाणी कारवाई करुन एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयाचे ४० हजार ५०६ लिटर कच्चे रसायन व १ हजार २१२ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु नष्ट करुन गावठी हातभट्टीवाल्याचे समुळ उच्चाटनासाठी धडक कारवाई केली आहे.
सदर कारवाईत जिल्हयांभरात एकूण पोलीस दलाचे एकूण ४६ पोलीस अधिकारी व २२२ पोलीस अंमलदार व राज्य उत्पादन शुल्क, जळगावचे एकूण ६ अधिकारी व २४ अंमलदार सहभागी होते.गावठी हातभट्टीवाले यांचे दाखल गुन्हयांचे रेकॉर्ड वरुन आजपावेतो पोलीस दलाकडून २ व राज्य उत्पादन शुल्क, जळगावकडून १ महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक – ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये ( एमपीडीए) च्या कारवाई करुन ३ इसमांना स्थानबध्द करुन १ वर्षासाठी कारागृहात रवानगी केली आहे. सदर एमपीडीए कारवाई अंतर्गत अजूनही जळगाव जिल्ह्यातील बरेच हातभट्टीवाले रडारवर आहे


