वरणगाव – भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथे अनंत श्री विभुषण जगतगुरू रामानंदासचार्यां श्री स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज सेवा समीती भुसावळ तालुका सेवा समीती द्वारा युवा सेना व महिला सेनेने ग्राम स्वच्छ अभियान राबविले

श्री नरेद्राचार्य महाराज दक्षिण पिठ नाणीजधाम (महाराष्ट्र ) या सेवा समितीच्या मध्यामातून प्रयेक महिण्याला आध्यात्मीक व सामाजिव उपक्रम राबविले जाऊन सामाजिक बांधीलकी जपली जात असल्याने तालुक्यातील दर्यापूर येथे ” तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ” हा महाराजांचा संदेश घेऊन भुसावळ तालुका सेवा समीती व वरणगाव सेवा समीती कडून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आपण सर्व एक आहो हा संदेश देण्यासाठी महाराजांचा नामाचा गजर करीत महिला सेना व युवा सेनेने गावातील रस्त्या स्वच्छ केले अभियानाच्या सुरुवातीस ग्रांम पंचायत कार्यालयाजवळ सर्व सेवा समितीचे सदस्य एकत्रीत येत स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली होती
यावेळी सरपंच सुशीला रोटे , ग्रा पं सदस्या आशा मेघे , सदस्य नितिन सोनवणे , अरविंद पाटील प्रमूख उपस्थीत होते .
अभियान यशस्वीते साठी भुसावळ तालुका सेवा अध्यक्ष मधुकर जवरे , सुनिल पाटील , वंदना नेमाडे , सुभाष चौधरी , चंद्रपाल ठाकुर यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने महिला व युवा सेनेचे सदस्य उपस्थीत होते


