भुसावळ –
भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील लिनेस गृप तर्फे ब-हाटे प्राथमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .
प्रसंगी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण झाले यावेळी लिनेस ग्रुपच्या सर्व सदस्या यांनी सुद्धा तिरंग्यास मानवंदना दिली त्यानंतर राष्ट्रगीत झाले व शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी पाटील यांनी लिनेस ग्रुपच्या अध्यक्ष व सदस्यांची ओळख करून दिली त्यानंतर सर्व अधिकारी व सदस्यांनी उपस्थित सुमारे २०० मुलांना बिस्कीटचे पुडे व चॉकलेट वाटप केले. बिस्कीटचे पुडे घेऊन मुलांना खूप आनंद झाला आपण लहान असताना आपल्याला 15 ऑगस्ट च्या दिवशी शाळेमध्ये चॉकलेट मिळत होते व त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर जो आनंद होता तोच आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला खूप प्रसन्न वाटले यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा प्रियंका चौधरी , सेक्रेटरी वैशाली सेतवाल , अनिता आंबेकर, पल्लवी जाधव, रीना गायकवाड अनिता ठाकूर इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.



