गारबर्डी येथे रुग्णांचे भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न : देवगिरी कल्याण आश्रम, रोटरी क्लब ऑफ रेल सिटी, इनरव्हिल क्लब ऑफ भुसावळ सिटी यांचा उपक्रम :


भुसावळ –
यावल तालुक्यातील गारबर्डी येथिल जी.प.शाळेत स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले . यात 12 तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते व 300 रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला गारबर्डी व आजूबाजूच्या वस्तीवरील जनजाती बांधव भगिनींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले यात स्री रोग, बालरोग नेत्र तपासणी, त्वचारोग, जनरल इत्यादी आजारांसाठी तपासणी झाली
प्रथम भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली रोटरी क्लब भुसावळ रेल सिटीतर्फे अध्यक्ष मनोज सोनार ,सचिव तेजस नवगाळे, अमित भडंग, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी चे अध्यक्षा सौ.रेवती मांडे,सौ. सीमा सोनार, प्रोजेक्ट मॅनेजर मृणाल पाटील तसेच देवगिरी कल्याण आश्रमाचे जिल्हाध्यक्ष डॉ निलेश भिरुड, प्रांत उपाध्यक्ष डॉ. किशोर मोरे व कार्यकर्ते यांच्या हस्ते भारतमाता पूजन शिबिराचे उद्घाटन झाले उद्घाटन प्रसंगी अमित भडंग यांनी आरोग्य व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासंबंधी माहिती दिली व येत्या चार महिन्यात आपल्या वनवासी बांधवांचे नेत्र तपासणी करून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून चष्मा व औषधे सह इतर सर्व खर्च केला जाईल असे सांगितले

काशिनाथ बारेला यांनी त्यांच्या बोलीभाषेतून शिबिराचे प्रयोजन सांगितले प्रांत उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे यांनी देवगिरी कल्याण आश्रम व त्याच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला यावेळी रुग्ण तपासणीसाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले बालरोग विभागात डॉ. अमित देवडा यांनी रुग्ण तपासणी केली स्री विभागात भुसावळ येथील स्त्री रोग तज्ञडॉ .सुवर्णा गाडेकर व डॉ. वृषाली चौधरी यांनी प्रत्यक्ष तपासणी करून मार्गदर्शन केले व औषधोपचार केला त्वचारोग तज्ञ निलेश भिरुडांकडे तर खूप रुग्णांची गर्दी होती त्वचा रोगाचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्यक्ष तपासणी करून औषधी दिली. नेत्र विभागात डॉ. समीर चौधरी व डॉक्टर शैलेंद्र बर्हाटे यांनी तपासणी केली यात 13 मोतीबिंदू ऑपरेशनचे रुग्ण निघाले या रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च रोटरी करणार आहे दंतरोग विभागात डॉ. मकरंद चांदवडकर व डॉ. विद्याधर भोळे यांनी तर जनरल विभागात डॉ. किशोर मोरे व डॉ. कल्पेश गुळवे यांनी तपासणी करून औषधोपचार केला याशिवाय डॉ. विजय सोनी डॉ. सूर्यभान पाटील डॉ.विकास गुळवे डॉ. कीर्ती चांदवडकर डॉ. राहुल पांडे यांची ही सदर आरोग्य शिबिराला उपस्थिती होती
महिला वैद्य मृणाल पाटील डॉ. नीलिमा गुळवे, डॉ. गौतमी गुळवे कल्याण आश्रमाच्या ॲड. चित्रा आचार्य,ॲड. जास्वंदी भंडारी,ॲड.मंजुषा कुलकर्णी,ॲड जयश्री देशमुख,महिला संघटन मंत्री चित्र पुराणिक,माता संगोपन व इतर माहिती उपस्थित माता-भगिनींना दिली देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला कार्यकर्ते व रोटरी महिला भगिनी यांनी ग्रामस्थ महिला यांच्या घरी जाऊन भेटी घेऊन मार्गदर्शन केले व आपल्या वनवासी बांधवांचे दैनंदिन जीवन प्रत्यक्ष घर, अंगण, पाणी व धान्य साठवणुक याची माहिती करून घेतली व मुलांमध्ये जाऊन खाऊ वाटप करून मनोरंजनात्मक आनंदाचा लाभ घेतला शिबिरात लाभ घेणाऱ्या सर्व रुग्णांना मोफत औषधी वितरण करण्यात आले यावेळी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या शिबिराचे यशस्वीतेसाठी मधुकर वाणी, मुगलाल बारेला , दिनेश बारेला, सुखलाल बारेला ,ज्ञानसिंग बारेला व इतर सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचे सहकार्य लाभले “तू मै एक रक्त”, वनवासी नगरवासी हम सब भारतवासी याचा अनुभव सर्वांनी अनुभवला