भुसावळ बाजारपेठच्या पोलीस कर्मचाऱ्यांची हवालदार पदी पदोन्नती ! –

भुसावळ –येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील ११ पोलीस कर्मचारी यांना स्वातंत्रदिनानिमित्त उत्कृष्ट कामगीरी व कर्तव्य बजावल्याबद्दल पोलीस अधिकक्षक यांचे आदेशांन्वये पदोन्नती देवून गौरविण्यात आले .
यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निलेश चौधरी, महेश चौधरी, विनोद वितकर, उमाकांत पाटील,दिपक पाटील, दिपक कापडणे,आशा बाविस्कर, तेजस पारीसकार,समाधान पाटील, संदीप परदेशी,यासीन पिंजारी यांचा समावेश आहे . यांनी
कर्तव्याशी प्रामाणिक राहून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळवले या कर्मचाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच वरिष्ठांनी दखल घेतली . बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या हस्ते या पोलीस कर्मचाऱ्यांना फित लावून व पुष्पगुच्छ देण्यात आले आव्हाड यांनी सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पदोन्नती मुळे अनेक मित्र मंडळी व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन होत असून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.पदोन्नती प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे .