वरणगाव शहरातील युवकाची आत्महत्या –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव खिडकी मोहल्ला भागातील रहिवासी शाहीद अल्ताफ बेग (मिर्जा, 30) या युवकाने मंगळवारी दुपारी दीड वाजेपूर्वी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुकानातच घेतला गळफास
शाहीद अल्ताफ बेग (मिर्जा) या युवकाचे स्टेशन रोडवर मिर्जा स्टिल फर्निचर नामक दुकान असून दुकानाच्या लोखंडी हुकाला दोरीचे सहाय्याने तरुणाने गळफास घेतला. याबाबबत शेख मोबीन शेख सखावत (38, खिडकी मोहल्ला, वरणगाव) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत ररुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व भाऊ असा परीवार आहे. तपास हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.