भुसावळ —- भुसावळ शहरातील येथील प्रभाग 22 मधील कस्तूरी नगरातीलसर्वे नंबर 131/2 मधील रहिवासी तसेच देना नगर , रघुकुल कॉलनी , रघुकुल कॉलनी ,मुक्तानंद कॉलनी,पारा हनुमान मंदीर परिसर ,आनंद नगरातील काही भागव इतर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याबबद्दल व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याबद्दल भुसावळ नगरपालिकेकडून याबाबत जाणूनबुजून होत असलेल्या दिरंगाईबाबत व तोंड बघून पाणीपुरवठा करणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकारी यांचेकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळणे बाबत. तसेच याविषयी आपल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडून दखल घेतली जात नसल्याने शेवटी आत्मदहनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिष्य जावळे यांनी नगरपालिका भुसावळ प्रशासनाला दिला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भुसावळ प्रभाग 22मधील शहरातील कस्तुरी नगरातील सर्वे नंबर एकशे एकतीस दोन मध्ये, रघुकुल कॉलनी मुक्तानंद कॉलनी, सोन्या मारुती हनुमान मंदिर परिसर , विनायक कॉलनी,आनंद नगरातील काही भाग,देना नगर व इतर परिसरात नियमित सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.आणि याबाबत आज पावतो किशोर जावळे यांचा परिसरातील नागरिकांनी सातत्याने माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र, माननीय पाणीपुरवठा मंत्री माननीय नगर विकास सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग,माननीय जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. असे असून देखील सुद्धा भुसावळ नगरपरिषदेने आमची पिण्याच्या पाण्याची कुठलेही ठोस उपाययोजना,व्यवस्था केलेली नाही. यांनी माझ्या एका तक्रारी नंतर एक बुस्टर पम्प बसविले ते हि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मात्र ती यंत्रणा कशी काय फ्लॉप गेली? पैश्यांचा अपवय केला गेला? देव जाणे?बूस्टर पम्प लावून सुद्धा या प्रभागातील काही परिसरातील नागरिकांना या बुस्टरबंपाच्या माध्यमातून मुबलक दबावाने पाणी का मिळत नाही? महिलांना रात्रं भर जागी राहावं लागतं? हे योग्य आहे का? आणि भुसावळचे पाणीपुरवठा अधिकारी महाशय स्पॉट व्हिसीट करून या परिसरातील बोगस नळ कनेक्श न का चेक करीत नाहीत? तसेच संबंधित परिसरामध्ये काही भागांमध्ये ज्या व्हॉल्व व रून पाणी सोडलं तर तो व्हॉलव्ह नाल्यामध्ये आहे .पाणी सोडण्याच्या वेळा नियोजन नाही. आम्ही वरिष्ठ स्तरावर तक्रारी करतो म्हणून आपल्या अधिकाऱ्यांकडून आम्हास जाणून-बुजून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल जात आहेे. जाणून-बुजून दर दहा दिवस ,पंधरा दिवसांनी दोन दोन दिवस वाढवले जातात त्यामुळे याबाबत पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना दर दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तक्रारी कराव्या लागतात.सतत फोन करावे लागतात .पुन्हा पुन्हा फोन करणे आणि तक्रारी करुन प्रभागातील नागरिक थकलेले असुन याचा सर्वांना मानसिक त्रास होतोय, याबाबत अनेकदा नगरपालिकेमध्ये येर झाल्या घालावे लागतात. दरवेळी दर दहा-बारा पंधरा दिवसांनी सातत्याने सतत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी कराव्या लागतात हे दुर्दैवाची गोष्ट आहे अशा नियोजन शून्य कारभाराविरुद्ध सर्व त्रस्त आहेत. सदर नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा शु द्ध हेतूदिसत आहे. या प्रकरणात यांच्यावर कुठ ला तरी राजकीय दबाव दिसत आहे. ते या प्रकरणात चालढकल करीत आहेत. असा आरोप सुद्धा शिशिर जावळे यांनी केलेला आहे. आज पावेतो तक्रार करूनही आम्हाला पिण्याचे पाणी नियमित मिळत नाही. सदर प्रभागात पिण्याच्या पाण्यासा ठी कुठलीही ठोस व्यवस्था केलेली नाही. भुसावळ नपाचे पाणीपुरवठा अधिकारी स्पॉट व्हिसीट करत नाही. तसेच प्रभाग क्रमांक 22 मधील काही परिसरामध्ये ओळखीच्या आणि तोंड बघून काही नागरिकांना रहिवाशांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. या प्रभागातील काही परिसरामध्ये दर तीन दिवसांनी पाच दिवसांनी असा बिनधास्त पाणीपुरवठा होतो. यामागे अर्थकारण असल्याची दाट शक्यतानाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत त्वरित युद्धपातळीवर पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होऊन योग्य न्याय मिळावा यासाठि तसेच तक्रारी करूनही वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवणाऱ्या भुसावळ नगर परिषदेचे वादग्रस्त पाणी पुरवठा अधिकारी, यांचेवर त्वरित कारवाई उपयोजना त्वरित न झाल्यास भुसावळ नगरपालिकेचे समोर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी तक्रारीअर्जाद्वारे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव ,मुख्याधिकारी भुसावळ न. पा प्रांताधिकारी भुसावळ यांना इशारा दिला आहे .