रावेर – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई सागर धरणावर 15 ऑगस्ट स्वातंत्रता दिनानिमित्त पूर्वसंध्येला तिरंगी रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे हे
मनोहरी दृश्य पाहून लोक खूप थक्क होत आहेत.
यावल मुक्ताईनगर भुसावळ परिसराला समृध्द करणाऱ्या हतनूर येथील तापी नदीवरील मुक्ताई सागर धरणावर तापी पाटबंधारे महामंडळातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.रात्रीचे वेळी धरणाचे हे दृश्य अत्यंत नयन मनोहरी आणि प्रसन्न करणारे दिसत आहे.याचा अनुभव घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसराला भेट देत आहेत.



