भुसावळ – भुसावळ वकील संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदय विद्यालय साकेगाव येथे विद्यार्थ्यांसाठी ॲन्टी रॅगिंग कायदा व पोक्सो कायदा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती च्या पुजनाने व दीप प्रज्वलनाने झाली
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते फौजदारी व दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.व्हि.जंगमस्वामी या होत्या रॅगिंग चे वाढते प्रमाण लक्षात घेवून हा विषय विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. न्यायाधीश जंगमस्वामी यांनी अन्याय ना सहो चुप तुम ना रहो हे सांगणारी नालसाची चित्रफित व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी चित्रफित प्रोजेक्टवर दाखविली.रॅगिग म्हणजे शारीरिक किंवा मानसिक हानी करणे, समोरच्याला अपमानास्पद वागणूक देणे, शैक्षणिक संस्था, निवासी शाळा, वसतीगृह किंवा जेथे शिक्षण दिले जाते तेथे हा कायदा लागू होतो एखाद्या विद्यार्थ्यांने रॅगिंग केले तर त्याचे पाच वर्षांसाठी निलंबन होवु शकते व कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही युजीसीकडुन 2018 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या यात एखाद्याला त्याची जात,धर्म, जन्मस्थान, ठिकाण,वंश यावरून हिणवले तर शिक्षा होवु शकते रॅगिंग संदर्भातील तक्रार टोल फ्री क्रमांकाने किंवा संबंधित वेबसाईटवर नोंदवता येते अन्याय होत असेल तर संज्ञा करू नका असे यावेळी सांगितले
ॲड. वैशाली चौधरी यांनी मुलींना स्पर्शातील फरक समजावून सांगितला कायद्यातील तरतुदी शिक्षा त्यातील पाडली जाणारी गोपनीयता तसेच असा काही प्रसंग समोर आला तर आपल्या घरातील मोठे व्यक्ती किंवा इतरांना सांगावे असे सांगितले रॅगिंग हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे अनेक मुलं मानसिक आजाराने त्रस्त होतात व आत्महत्या करतात यामुळे मुलांचे भविष्याचे नुकसान होते असे मत ॲड. धीरज शंखपाळ यांनी मांडले
भुसावळ वकील संघाच्या महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी जागतिक युवा दिन का साजरा करतात यावर भाष्य केले तसेच शिक्षण घेणारी युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे त्यामुळे आपल्या भविष्याकडे लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने प्रयत्न करावे व समाजात देशात आपले वेगळे स्थान निर्माण करावे अपयशाने खचून न जाता नव्याने सुरुवात करावी असे मार्गदर्शन मुलांना केले
कार्यक्रमाचे सुरवातीला विद्यालयाचे प्राचार्य श्री व्हि.एस्.अंभोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड आय आय खान यांनी तर आभार प्रदर्शन श्री संजय सराठे यांनी मानले यावेळी मुलांसाठी प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला समारोप विद्यार्थ्यांना
रॅगिंग करणार नाही याची शपथ देवुन केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मिलिंद राजे,अजय धारणे, मीनाकुमारी,रेनु झा,एन्.पी.सिंग,एस् के.झा , विनायक बोरलकर,आयशा, सुषमा कुमारी, कमलाकर जावळे,मानकर यांनी प्रयत्न केले यावेळी ॲड.रायभोळे, ॲड भारमल,ॲड. रमेश पांडव उपस्थित होते



