ऑनलाईन रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणाली – लिंक अपडेट ;

भुसावळ –
दिनांक 9/8/2023 रोजी केंद्र चालक यांचे प्रशिक्षण तहसिल कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण.उपविभागीय अधिकारी भुसावळ, .तहसीलदार , असतकर पुरवठा निरीक्षक अधिकारी भुसावळ हे उपस्थित होते
नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, शिधापत्रिका संबंधी सेवा जसे की नवीन शिधपत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, नाव वाढवणे कमी करणे इत्यादी ऑनलाईन स्वरूपात पब्लिक लॉगिन चा वापर करून लाभ घेता येईल. याकरिता www.mahafood.gov.in या संकेस्थळावरील ऑनलाईन रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणाली या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.