भुसावळ – ९ ऑगष्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीने आदिवासी बांधवां सोबत साजरा केला

प्रारंभी कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी आदिवासी दिन व क्रांती दिना बद्दल माहिती दिली आदिवासी समाज बांधव व भगिनीचे स्वागत करण्यात आले आदिवासी समाजाबद्दल प्रा. डॉ. एम. आर संदानशिव , प्रदेश उपाध्यक्ष मो. मुन्वर खान , प्रदेश सचिव भगवान मेढे यांनी मार्गदर्शन केले. नविन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तफै मुन्वर खान, भगवान मेढे, डॉ. एम. आर. संदानशिव, इमान खान दलित साहित्य अकादमी च्या अध्यक्ष पदी, निवड झाल्या बद्दल सागर. वानखेडे यांचा सत्कार शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी केला. यावेळी शहर कॉग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष शैलेंद्र नन्नवरे, जानी गवळी, अजगर , सुजाता सपकाळे, शहर सरचिटणीस प्रशासन संतोष साळवे व सलिम गवळी, सिध्दार्थ सपकाळे, हाजी न ईम पहेलवान, नसिम तडवी, राव अवतार परदेशी, शहर सरचिटणीस संघटन शैलेश अहिरे,महेंद्र महाले शहर सचिव महिला जिल्हा उपाध्यक्ष हमिदा गवळी, वंदना चव्हाण, महिला शहर कॉग्रेस अध्यक्ष यास्मिन बी, बेबी उदा, विमल उदा, दादा उदा अतुल बाविस्कर इत्यादी कार्यकतै उपस्थित होते


