भुसावळ – प्रतिनिधी
इन्स्पायर अवॉर्ड योजना ही विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी असून आपल्या आजूबाजूला असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते या योजनेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पनेला मॉडेल स्वरूपात मांडण्यासाठी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास मदत होते याकरिता शाळा स्तरावरती विज्ञान प्रदर्शन घेऊन यामधील चांगल्या कल्पना इन्स्पायर अवॉर्ड मध्ये मांडण्यात यावे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करून द्यावा असे आवाहन भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले
भुसावळ तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची बैठक के नारखेडे विद्यालयात आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे होते यावेळी विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे भुसावळ तालुका सहसमन्वयक नीलिमा पाटील उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये इन्स्पायर अवार्ड योजना, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन यासह विविध वर्षभरात शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या वैज्ञानिक योजनांची माहिती शिक्षकांना देण्यात आली

आयडिया बॉक्स योजना राबवा
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध समस्यांवरती विद्यार्थ्यांकडे देखील उकल उपलब्ध असते त्यांच्याकडे उपयोगी जुगाड समजून घेण्यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना त्यांची आयडिया समस्या व त्यावरील उपाय याबाबतची माहिती कागदावर लिहून ती एकत्रित आयडिया बॉक्स मध्ये जमा करावी विद्यार्थ्यांच्या या आयडिया विज्ञान शिक्षकांनी वाचून त्यामधील नाविन्यपूर्ण कल्पनेला इन्स्पायर अवार्ड योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करावे यामुळे विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते तसेच विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होत असल्याचे नीलिमा पाटील यांनी सांगितले
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमुळे लघुशोध प्रकल्प तयार करण्याची सवय जडते
राष्ट्रीय बालविज्ञान परिषद ही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा नसून निवड प्रक्रिया आहे यामुळे विद्यार्थ्यांना लघुशोध प्रकल्प करण्याची सवय जडते विद्यार्थीनी समाजाला भेडसावणारे विषयानुरूप समस्या निवडून विद्यार्थ्यांचा गट तीन ते पाच महिने काम करतो हे काम करत असताना विद्यार्थी विविध पद्धतींचा वापर करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात यासाठी विद्यार्थी विविध माध्यमांचा वापर करतात विद्यार्थ्यांना शोध प्रकल्पाच्या माध्यमातून अनुमान निष्कर्ष काढून सादरीकरण करण्याची सवय लागते उच्च शिक्षण वेळी त्यांना शोध प्रकल्प तयार करण्यासाठी मदत होत असल्याची माहिती जिल्हा समन्वय सुनील वानखेडे यांनी दिली
महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्याचा गौरव
सन 2022 -23 मध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथील वेदांत सचिन माळी याची राज्यस्तर विज्ञान प्रदर्शनातून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली ही बाब भुसावळ तालुक्यासाठी गौरवासपद असून या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक सचिन माळी यांचा गौरव यावेळी करण्यात आला तसेच या उपकरणात उपयोगी बदल करून राष्ट्रीय स्तरावरती भुसावळ तालुक्याचे नाव मोठे करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार गट साधन केंद्राचे विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील यांनी केले


