डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आनंदात साजरी केली आषाढी एकादशी.


आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी भुसावळ शहरात अष्टभुजा मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी यात्रा काढली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत , टाळांच्या गजरात वातावरण भक्तीमय बनवले. विठ्ठल मंदिरात देवाची आरती करण्यात आली ,तसेच मुलांकडून समाजप्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील तसेच शाळेतील शिक्षक गण उपस्थित होते .अत्यंत शिस्तपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.