विठ्ठल विठ्ठल च्या गजराने ताप्ती स्कुलचा आवार गजबजला.


भुसावळ येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये आषाढी एकादशी निमीत्त शाळेतील विद्यार्थी हे नटून थटून शाळेत आले होते.
शाळेत विठ्ठल रुकमाईचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता.विद्यार्थीनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले.
या वेळी शाळेतील विदयार्थीनी शाळेच्या परिसरात दिंडी काढली होती. विठ्ठल विठ्ठल पांडूरंग विठ्ठल असा जय घोशाने शाळेचा परिसर गजबजला. तेथे पुर्ण भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शाळेतील विद्यार्थी हे ताळ, मृदुंग, ढोल, झांज वाजवत दिसून येत होते.विद्यार्थीनींच्या हातात भगवे झंडे होते.
यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी सर्व विदयार्थांनाना मार्गदर्शन केले.सोनाली मुजूमदार,स्मिता जाधव
शितल निंबाळकर,हेमलता नारखेडे,रुपाली चौधरी,गायत्री घीर्णीकर,मनप्रीत कौर,हर्षला चौधरी,ऍनेट मॅथ्यू,अकबर खान यांनी परिश्रम घेतले.