आषाढी एकादशी निमित्त अनिल बागुल व परिवारातर्फे दिंडीचे उत्साहात स्वागत :


भुसावळ – गेल्या चार पिढीपासून सुरू असलेली परंपरा आजही येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी अनिल बागुल व परिवार सांभाळून आहेत . सालाबाद प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त अनिल बागुल व परिवारातर्फे श्री विठ्ठल रुखमाई संस्थान तर्फे गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता निघालेल्या दिंडीचे स्वागत रस्त्यावर भव्य रांगोळी काढून फटाक्यांचे आतषबाजीत अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात करण्यात आले.
यावेळी दिंडीत सहभागी समस्त वारकरी यांचे पुष्पहार अर्पण करून व ओवाळून स्वागत करण्यात आले
दिंडीत सहभागी भाविक वारकरी महिला भगिनी यांना फराळ (साबुदाना खिचडी व लाडू वाटप करण्यात आले .
दिंडी यशस्वीतेसाठी अनिल बागुल , मंदार बागुल ,प्रविण चौधरी , अजय चौधरी , शुभम तळेले , आकाश कोळी, हर्षल शिवदे , अमोल फेगडे , कैलास ब-हाटे , सुनील शिंपी , गजानन बोके , नामदेव ब-हाटे , यांचेसह समस्त बागुल परिवार यांनी सहकार्य केले .

……..आषाढी व कार्तिकी एकादशीला दिंडीचे स्वागत करण्याचा फार आनंद होतो आम्ही आषाढी व कार्तिकी एकादशीची मनापासून वाट बघत असतो श्री पांडुरंग कृपेने आजही गेल्या चार पिढीपासून दिंडीचे स्वागत करण्याची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे . यामधून वाडवडीलांचे संस्कार व माणुसकी यासह एकात्मतेचा आनंद आम्हा सर्वांना मिळतो असे मत अनिल बागुल यांनी व्यक्त केले .