नीता हिवाळे यांना राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार :


भुसावळ- बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी येथील पैनगंगा महिला बहुउदेशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता हिवाळे यांना राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार २०२३ देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले .
बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी या छोट्याश्या गावातून महिलांना बचत गटाचे माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देणें , गावातील महिलांना व मुलीं सक्षम व्हाव्यात याकरिता स्वतः लेडीज जिम योजनेतून चालवत आहेत..वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय योजनेचे प्रशिक्षणाचे लाभ महिलांना मिळवून दिले गावातील महिला घरी बसूनही आपल्या घरात संसारात दोन पैसे कमवून हातभार लावता येईल याचे महत्व महिला समजावून त्यांचे मनोबल वाढवण्यास सहकार्य कार्य सतत करत असतात हिवाळे यांचे समाजकार्य बघून नांद्राकोळी गावाचे सरपंच संजय कळवाघे
उपसरपंच मनोज जाधव यांनी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली व
राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार सोहळा 2023 या पुरस्कारा साठी सौ.निता हिवाळे राजमाता अहिल्याबाई होळकर २०२३ पुरस्काराने सन्मानित केले समाजात आणि गावातील ऐक आदर्श निर्माण करून सर्व महिला ऐक मानाच स्थान दिले आहे.

निताताई हिवाळे याना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल भुसावळ येथील अनुश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री इंगळे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच
सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .