विठ्ठल भक्तांच्या आषाढी वारीला विशेष रेल्वे गाडी : रेल्वे राज्यमंत्री यांनी दिली मान्यता – खा. खडसे यांच्या प्रयत्नांना यश :

मुक्ताईनगर

जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनआरक्षित “ विशेष आषाढी ” रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे .

रेल्वेगाडीची मागणी रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे केली होती .
खा. रक्षा खडसे यांच्या मागणीला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मान्यता दिल्याने दि.२८ जून रोजी दु.१.३० वा. भुसावळ स्टेशन येथून रेल्वेगाडी सुटून दि.२९ जून रोजी पहाटे ३.३० वा. पंढरपूर येथे पोहचणार आहे . तर त्याच दिवशी रात्री १०.३० वा. परतीसाठी निघणार असून दि.३० जून रोजी भुसावळ येथे पोहचणार असल्याने जळगांव व बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांच्या आषाढी एकादशी वारीचा प्रवास सुखकर होणार आहे . जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील वारकरी व भाविकांसाठी सन २०१४ पासून खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने भुसावळ – पंढरपूर – भुसावळ “ विशेष आषाढी रेल्वे ” सोडण्यात येत असुन याचा परिसरातील असंख्य वारकरी भाविकांना लाभ होत आहे. सदर रेल्वेत त्यांच्यामार्फत नाश्ता, जेवण, फराळ व पाण्याची स्वखर्चाने व्यवस्था करण्यात येते. कोवीड नंतर मागील वर्षी खा. रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने सदर गाडी पुन्हा चालू झाली असून यावर्षी सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने वारकऱ्यांना पंढरपूर वारी घडणार आहे.