शहरातील प्रत्येक शाळेमधील वर्गांमध्ये फँन व कुलरची व्यवस्था करावी शिवसेना ठाकरे गटाची मागणी : गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ – शहरातील प्रत्येक शाळेमधील सर्व वर्गामध्ये कमीत कमी ५ फॅन व २ कुलर ची ववस्था करावी अशी मागणी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केली असून याबाबत आज बुधवार रोजी गट शिक्षणाधिकारी यांचेशी चर्चा करून निवेदन देण्यात आले .

भुसावळ शहर हे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उष्णतेचे शहर म्हणून ओळखले जाते अशात दीपणगर मधील ओष्निक वीज निर्मितीमुळे भुसावळ शहरातील पारा ४४ च्यां जवळ पास पोहोचलेला आहे त्यामुळे सकाळी १० वाजेनंतर भुसावळ शहरात फिरणे म्हणजे आगीत चालण्यासारखे आहे
त्यातच येत्या१५ तारखे पासून संपूर्ण शाळा सुरू होत आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच गोदावरी फाउंडेशन चां एक विद्यार्थी उष्णघातामुळे मरण पावला आहे त्यातच विद्यार्थांना वर्गामध्ये उकाड्याचा सामना करावा लागतो कारण प्रत्येक वर्गामध्ये फक्त दोनच फॅन ची व्यवस्था आहे त्यातच एक फॅन हा शिक्षकाच्या डोक्यावरती असतो तर एक फॅन मध्ये सर्व ५०-६० विद्यार्थी बसलेले असतात त्यामुळे अशा गर्मी मध्ये त्यांचं शिकवण्याकडे दुर्लक्ष होते व याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो ओघाने मार्क वरती होतो शाळे मध्ये जाऊन प्रतक्ष पाहणी केली तर लक्षात येईल की बऱ्याच शाळेच्या टीचर रूम मध्ये कुलर लावलेले आहे तर प्राचार्याचे ऑफिसमध्ये एसीची व्यवस्था केलेली आहे, आणि विद्यार्थ्यांना एका फॅन मध्ये शिक्षण घ्यावं लागते आहे त्यामुळे आजच सर्व शाळेना पत्र देऊन प्रत्येक वर्गा मध्ये कमीत कमी ५ फॅन दोन मुली च्या रांगे मध्ये दोन मुलांच्या रांगे मध्ये व एक फॅन शिशकाच्या खुर्ची च्या वर लावावा जेणे करून मुलांना शिक्षण घेत असताना आवड निर्माण होईल व याचा फायदा त्यांच्या मार्क वर होईल व ते आपल्या गावासह जिल्ह्याचे राज्याचे व देशाचे नाव लोकिक करतील तरी या मागणीची तत्काळ कारवाई व्हावी अन्यथा आपल्या कार्यालय समोर सर्व शिवसैनिक पदाधिकारी तसेच भुसावळ शहरातील विद्यार्थी व त्यांचे पालक उपोषण करणार तसेच उष्णतेमुळे विद्याथ्र्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला संपूर्ण जबाबदार शासन त्या शाळेचे प्राचार्य व सस्था चालक राहतील असा इशारा दिला .
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,हमंत खमवैत,निलेश महाजन,कैलाश लोखंडे,विनोद गायकवाड,पप्पू भैया,अरुण साळुंके,नरेंद्र लोखंडे,योगेश बागुल,पिंटू भोई, दिलीप सुरवाडे,मनोज पवार,संदीप पाटील,गोकुळ बाविस्कर,महमूद शेख,सोनी ठाकूर आदि उपस्थित होते .