फेकरी ता.भुसाव – पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर फेकरी गावातील ग्रामपंचायत सरपंच चेतना संजय भिरूड यांनी गावातील नालेसफाई कामास दि.१२ जून२०२३ पासून सुरुवात केली आहे. जेणेकरून पावसाळ्यात नाल्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही, याची काळजी घेत मारुती मंदिरापासून नालेसफाई करण्यात आली

. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश नाफळे, सुनील बऱ्हाटे ,संजय भिरूड, गजानन नेमाडे, दिलीप भिरूड , दिलीप पाटील उपस्थित होते . पावसाळ्यात आधी नालेसफाईचे काम सरपंच चेतना भिरुड यांनी स्वतः उभे राहून कामगारांकडून करून घेत असल्याने गावकऱ्यांनी सरपंचांचे कौतुक केले आहे.


