भुसावळ – शहरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत असून
बारा दिवसातून एक वेळा पाणी ,अन् तेही चक्क रात्री दीड वाजता पाणीपुरवठा करणाऱ्या नगर पालिकेच्या कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी. अशी मागणी ग्राहक पंचायतीचे
प्र.ह.दलाल यांनी केली आहे .
.गेेल्या वर्ष दोन वर्षांपासून भुसावळ नगरपालिकेच्या बेजबाबदार व अकार्यक्षम कारभारामुळे नागरिक पाण्यासाठी अक्षरशः वैतागले आहेत. शहरानजीक हतनूर सारखे मोठे धरण आहे धरण
उशाला,तरी कोरड घशाला,तापी माय पाणी द्यायला समर्थ आहे पण पालिकेच्या नियोजनशून्य,बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना १२/१५ दिवसातून एकच वेळा नळाद्वारे पाणी. मिळत आहे.मिळणारे पाणीही अगदी अशुद्ध,गढूळ,व पिण्यास योग्य नसते.बिचारे नागरिक तेही नसे थोडके म्हणून विना तक्रार तेच पितात,त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत.आणि विशेष म्हणजे पाणी केव्हा येईल तेही नक्की नसते.ना नक्की वार,ना नक्की वेळ ! अक्षरशः थोड्या थोड्या वेळाने मोठ्या आशेने लोक नळ सुरू करून पाहतात.कधी सकाळी तीन,चार ला,तर कधी रात्री दीड,दोन वाजता काही वॉर्ड त भरपूर पाणी,तर काही ठिकाणी जेमतेम ,काही ठिकाणी मोटार न लावतही दोन तीन मजले पाणी पोहचते तर काही ठिकाणी जमीन पातळीवरही मोटार लावल्याशिवाय पाणी येत नाही.अन् त्याच वेळी जर लाईट गेले तर मग फजिती विचारूच नका.न.पा.ने ठिकठिकाणी बोअर वेल/ कुप नलिका,उपलब्ध करून द्याव्यात,टँकर ने पाणी द्यावे पण हेही करायला तयार नाही.वास्तविक पिण्यासाठी वेळेवर शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.पाणी उपलब्ध असूनही नागरिकांचा शारीरिक,मानसिक छळ करणाऱ्या न पा.तील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन अकार्यक्षम,बेजबाबदार वर्तन बद्दल त्यांचेवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्राहक पंचायत,महाराष्ट्राचे जिल्हा संघटक प्र.ह.दलाल.यांनी केली असून याबाबत पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे कडेही तक्रार अर्ज देणार असल्याचे दलाल यांनी म्हटले आहे.



