भुसावळ विभागात रोजगार मेळाव्यात ११० उमेदवारांना दिले नियुक्ती पत्र :


भुसावळ – केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज १३ जून २०२३ रोजी भुसावळ मंडळ येथे “रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला होता . यावेळी ११० उमेदवारांना अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय), सुनीलकुमार सुमन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रसंगी केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, त्याचा लाभ सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी घेतला.
नियुक्ती मिळाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व उमेदवारांचे आभार व्यक्त केले ते म्हणाले की, रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने झाली आहे.
या कार्यक्रमात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय), सुनील कुमार सुमन, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहाय्यक कार्मिक अधिकारी .व्ही.एस.वडनेरे, सहायक कार्मिक अधिकारी प्रदीप कलाल, सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल राईकवार उपस्थित होते. उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी
व्ही.एस.वडनेरे यांनी केले.
आभार वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भरती विभाग,एस अँड टी विभाग, विद्युत विभाग, अभियांत्रिकी विभाग यांनी सहकार्य केले.