जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी भागात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात चौघांनी २३ वर्षीय युवकास मारहाण करून विष पाजले यात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला . याप्रकरणातील चौघे फरार आरोपीना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले . असून या प्रकरणी जळगाव एमआय डी सी सिसिटीएनएस नं. ३८३ /२०२३ भादवि कलम ३०२, १२० [व] ,३४ प्रमाणे आज
१३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

फिर्यादी प्रकाश रघुनाथ चौधरी वय-, रा.रामेश्वर कॉलणी जळगाव यांनी दिनांक ११/६/२०२३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान जळगाव
शहरातील हॉटेल जान्हवी जवळ व सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनी फिर्यादी राहत असलेले
गल्लीत जुण्या भांडणाचे कारणावरुन आरोपी सचिन कैलास चव्हाण वय ;२३, तुषार उर्फ सोन्या विजय
पाटील वय-२४ ]सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव वय-३६ ,कुदंन रविंद्र पाटील वय-३० सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव अशांनी कट कारस्थान करुन फिर्यादीचा मुलगा [मयत] चेतन प्रकाश चौधरी वय-२३ वर्षे यास जळगाव शहरतील
प्रियंका किराणा जवळ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून काहीतरी विषारी पदार्थ पाजले दरम्यान मुलगा
[मयत] चेतन यांच्यावर औषधोपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला
सदर गुन्हांतील आरोपी यांची पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी
वरुन एम आय डी सी पोस्टेचे पोना विकास सातदिवे, पोकॉ छगन तायडे, ईश्वर भालेराव व पोहेकॉ चालक इम्तीयाज अली
खान यांनी जळगाव शहरातील मेहरूण बगीचा या ठिकाणी यातील आरोपी सचिन
कैलास चव्हाण वय-२३, तुषार उर्फ सोन्या विजय पाटील वय-२४ सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव वय-३६ , कुदंन
रविंद्र पाटील वय-३० सर्व रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हे शासकीय वाहन पाहुन पळु लागल्याने सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग केला व चारही आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कार्यवाही एम राजकुमार, जळगाव जिल्हा अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत
गवळी ,तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित., जळगाव व पोलीस निरीक्षक
जयपाल हीरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलि उप निरीक्षक दिपक जगदाडे, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना
विकास सातदिवे,किशोर पाटील, पंकज पाटील, पोकॉ छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, सतिष
गर्जे, पोहेकॉ चालक इम्हीयाज खान अशांनी केली आहे. गुन्हांचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिपक जगदाडे करीत आहेत.


