वरणगावला जालंदर नगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरनचा शुभारंभ : शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना मिळाला होता निधी :

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव येथील जालंदरनगरमध्ये आज शुक्रवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटी करनाचा शुभारंभ करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या काळात जिल्हाप्रमुख यांना एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. याच निधीमधून त्यानंतर जालंदर नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ झाला. या आधी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी यास वार्डात विविध प्रकारचे कामे केलेली आहे. यामध्ये बोरवेल चे काम, मंदिराचे काम, बुद्ध विहाराचे काम, ढापे चे काने केलेली आहे.

रस्ता काँक्रिटीकरणाच्या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, उप तालुका प्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, उप शहरप्रमुख राम शेटे, विधानसभा संघटक निलेश सुरडकर, शाखाप्रमुख संजीव कोळी, कृष्णा पाटील नितीन पाटील, कृष्णा पुजारी, विनायक माळी, वसंत भोई, शोभा पाटील, बुनकर यांच्यासह वॉर्डातील महीला आणि पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते.