छत्रपती शिवाजी महाराजांबददल बेताल वक्तव्य करणाऱ्या बस कर्मचा-या विरुद्ध त्वरित कठोर कारवाई व्हावी : भुसावळ शिवप्रेमी नागरिकांची मागणी : प्रांताधिकारी यांना दिले निवेदन ;


भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराजांबददल
व्हॉटसप अॅप वरील भुसावळ आगार या
गृप वर बेताल वक्तव्य करून अपमान करणाऱ्या
एसटी कर्मचारी रिजवान आय सैय्यद विरुद्ध त्वरित कठोर कारवाई व्हावी तसेच त्यास एस टी महामंडळामधून कार्यातून निलंबित करावे अशी मागणी शहरातील शिवप्रेमी जनतेने केली असुन याप्रकरणी भुसावळ उपविभागीय अधिकारी यांना आज ८ जून रोजी निवेदन देण्यात आले आहे .तसेच बाजार पेठ पोलिस स्टेशनला याबाबत त्वरित कारवाई व्हावी म्हणून अर्ज दिलेला आहे. सदर कर्मचारी नियमीतपणे हिन्दु धर्माविरुद्ध तेढ निर्माण होवून जातीय वाद भड़कवण्या बाबत बोलत असतो व दादागिरी करीत असतो. कदाचित त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शहरात कायम शांतता राहण्यासाठी अशा प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे यांचेविरुद्ध पोलिस स्टेशनला अर्ज दिलेला असुन त्याला अद्याप अटक झालेली नाही. तरी सदर कर्मचारी यावर
कारवाई व्हावी तसेच त्याास एस.टी.खात्यातुन निलंबीत करण्यात यावे. सदर कारवाई न झाल्यास शहरात
शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करतील असा खनखनीत इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
सदर प्रत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना सुद्धा पाठविन्यात आली आहे .
निवेदन देते समयी , राजेन्द्र आवटे राजेन्द्र नाटकर , युवराज लोणारी , महेन्द्रसिंग ठाकुर दिपक चाडे , मुकेश गुंजाळ , यांचेसह असंख्य शिवप्रेमी यावेळी उपस्थित होतेे