भुसावळ मध्ये प्रथमच दुर्गा वाहिनी व मातृ शक्ती आयोजित शौर्य प्रात्यक्षिक अभ्यास वर्गाचे आयोजन :


भुसावळ — येथे प्रथमच दुर्गा वाहिनी व मातृ शक्ती भुसावळ जिल्हा यांच्यावतीने शौर्य प्रात्यक्षिक अभ्यास वर्गाच्या आयोजन संतोषी माता सभागृह, मातृभूमी चौक भुसावळ येथे दिनांक 11/ 6 /2023 रोजी सकाळी १०.३०ते दोन या वेळेत केलेले आहे
हिंदू माता भगिनींचे रक्षण सबलीकरण व सक्षमीकरण तसेच त्यांचे मन व मनगट मजबूत करण्याचे हेतूने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्ती तर्फे या प्रात्यक्षिक वर्गाच्या नियोजन करण्यात आले आहे तरी भुसावळ शहर व परिसरातील माता भगिनींनी महाविद्यालयीन तरुणींनी बहुसंख्येने या प्रात्यक्षिक अभ्यास वर्गाला उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा महिला समन्वय प्रमुख ॲड. जास्वंदीताई भंडारी (पाटील),दुर्गा वहिनी भुसावळ जिल्हा संयोजिका ॲड. स्नेहल विसपुते, विश्व हिंदू परिषद भुसावळ जिल्हा प्रमुख योगेशजी भंगाळे यांनी केले आहे