भुसावळ – येथिल ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय सेमीणारचे आयोजन दि ८ जून पासून करण्यात आले होते. त्याचा समारोप आज दि ९ जून शुक्रवारी झाला.
शाळेतील शिक्षकांसाठी हे सेमीणार ठेवण्यात आले होते. या सेमिणारच्या समारोप प्रसंगी केरळ येथिल डॉ जयराम नायर यांनी ताप्ती पब्लीक सीबीएसई स्कुल च्या शिक्षकांना नॅशनल एज्युकेशन पॉलीसी अंर्तगत विविध विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की शालेय शिक्षण पद्धतीच्या पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभ्यासक्रम,अध्यापन शास्त्र, सर्वसमावेशक शिक्षण पद्धती अशा विवीध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले.
तर डॉ.जयराम नायर यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रिंसिपल निना कटलर यांच्या सह शाळेच्या आवारात वृक्षा रोपन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांच्यासह सोनाली मुजूमदार,स्मिता जाधव,मनप्रित कौर, ऍनेट मॅथ्यू,हर्षला चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार सोफीया पीबॉडी यांनी केले



