भुसावळ – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. श्री बाळासाहेब आंबेडकर हे भुसावळ येथे आदिवासी हक्क परिषदेच्या निमित्ताने आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन सर यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. या भेटी दरम्यान भुसावळ विधानसभा तसेच आगामी निवडणुका संदर्भात चर्चा झाली.
यावेळी तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, संघटक बबलू बराटे, भुसावळ शहरप्रमुख दीपक धांडे,. वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेशदादा चौधरी, रहीम गवळी, प्रा. दिलीप सुरवाडे सर, वरणगाव शाखा प्रमुख संजीव कोळी, प्रवीण बाविस्कर, योगेश कोळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



