वरणगाव शिवसेनेतर्फे उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त दुग्धाअभिषेक : प्रचंड घोषणाबाजीने परिसर शिवमय :

वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन वरणगाव शहर शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे नगरपरिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रचंड घोषणाबाजी करून परिसर शिवमय झाला होता.

अखंड हिंदुस्तानचे दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 6 जून रोजी 350 वा राज्याभिषेक दिन वरणगाव शहर शिवसेना पक्षातर्फे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पाण्याने स्वच्छ करून नंतर दुग्धाभिषेक करण्यात आला. नंतर पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन परिसर शिवमय होऊन उत्साहपूर्ण वातावरणात परिसर दनाणून गेला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शहरप्रमुख संतोष माळी, युवा सेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, उपशहर प्रमुख सुनील भाऊ, राम शेटे, आबा सोनार, सुखदेव धनगर, शाखाप्रमुख संजू कोळी, गोली भाई, विकी मोरे, प्रल्हाद माळी, जितू माळी, नंदू खराटे, विवेक माळी, यश माळी, वैभव माळी, दिनेश माळी, रितेश माळी यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते