जळगाव – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा झाडे वाचवा असे व्रत स्वीकारलेल्या नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या हस्ते पावसाच्या आगमनापूर्वी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापौर जयश्री महाजन, राष्ट्रीय समाज प्रबोधनकार रामायणाचार्य ह भ प कु माईसाहेब महाराज जळगावकर , नगरसेवक अनंत जोशी, नारीशक्ती संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील, पंकज नाले, वसंत पाटील ,भारती पाटील ,आनंद पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महापौर जयश्री महाजन यांनी वृक्षांचे अनन्य साधारण महत्व विषद करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जळगाव करना झाडे लावून झाडे जगवण्याचे आवाहन केले .
ह.भ.प कु माईसाहेब महाराजांनी
मानवी जिवन निसर्गावर अवलंबून असून . निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यावश्यक असल्याचे सांगीतले . तसेच निसर्गाच्या सानिध्यात आपले जिवनमान कसे फुलवावे यासंदर्भात उदबोधन केले . या प्रसंगी प्रामुख्याने वड, कडुलिंब, करंज, कदंब, काशीद, पिंपळ, औदुंबर ही देशी वृक्ष लावण्यात आली. थंडगार सावली ,शुद्ध हवा तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अत्यंत उपयोगी असलेल्या या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने स्वीकारली. याप्रसंगी नेहा जगताप,विद्या जकातदार, लिना पाटील,वंदना मंडावरे, भाग्यश्री महाजन, नीता विसावे, माधुरी शिंपी, किमया पाटील, मरियम बुगडवाला, राधिका पाटील, शरयू पाटील, मीनाक्षी शेजवळ,हर्षाली तिवारी, भाग्यश्री महाजन या पदाधिकारी उपस्थित होत्या.


