भुसावळ – येथील नेवे वाणी समाज मंडळ आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या ग्राऊंडवर पडल्या. या स्पर्धेत भुसावळ, जळगाव, साकळी, नाशिक, पुणे, बर्हाणपूर येथील संघांचा समावेश होता.
स्पर्धेचा शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बर्हाणपूर मंडळाचे अध्यक्ष बलराम सुगंधी तर प्रमुख पाहुणे म्हणून नेवे वाणी समाज पुणे मंडळाचे अध्यक्ष तुषार नेवे हे होते. अध्यक्ष बलराम सुगंधी यांच्या हस्ते श्रीफळ व दिपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी नेवे वाणी समाज मंडळ भुसावळचे अध्यक्ष किशोर नेवे, उपाध्यक्ष दिपक नेवे, सचिव राम माहूरकर यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विनीता नेवे, उपाध्यक्षा अंजली नेवे, सचिव पूजा नेवे उपस्थित होते. दिवसभर पार पडलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना जळगाव येथील गोविंदा संघ व बर्हाणपूर येथील संघात झाला. या जळगावच्या गोविंदा संघाने बर्हाणपूर संघाचा पराभव करित विजय मिळविला. स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय नेवे भरूच व सौ.रंजना नेवे चोपडा हे होते. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज कुणाल लेले व नम्रता दलाल यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच विजयी गोविंदा संघ व उपविजयी बर्हाणपूर संघास ट्रॉफी व रोख बक्षिस, मेडल वितरण करून गौरविण्यात आले. सुत्रसंचलन किरण नेवे यांनी तर आभार संजय नेवे व सौ.विनीता नेवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.



