शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप : भुसावळात शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात व जल्लोशात साजरा : प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य कौतुकास्पद उपक्रम : भुसावळकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे :


भुसावळ – हिंदवी स्वराज्य निर्माते, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून
६ जुन २०२३रोजी आ. संजय सावकारे यांचे मार्गदर्शनाने तथा
प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे आयोजित
शिवराज्याभिषेक दिन ३५० वर्षपूर्ती सोहळा दनक्यात साजरा झाला .भुसावळकरां बहारदार , दैदीप्यमान नयन रम्य सोहळयांचा मनमुराद आनंद घेतला .
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात
गणेश वंदनेने झाली यावेळी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला तदनंतर शिव कालीन मैदानी खेळ
यात दांड पट्टा, काठी फिरवणे , तसेच तलवारबाजी या सारख्या मैदानी खेळाचे सादरीकरण झाले नंतर झेंडा पथक लेझीम ढोल ताशांच्या गजरात शिव पालखी काढण्यात आली .
कार्यक्रमा प्रसंगी आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे ,प्रांताधिकारी जितेंद्र चौधरी , उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे , पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, गजानन पडघन, विलास शेडे, मनोज बियाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके सर्व संचालक, भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील , जिल्हा दूध संघाच्या संचालिका सौ शामल झांबरे , शहर अध्यक्ष भाजपा परीक्षित बऱ्हाटे , युवराज लोणारी ,स्टार लॉन्स चे विजय चौधरी , उद्योगपती मनोज बियाणी ,राजू आवटे ,गिरीश महाजन ,सतीश सपकाळे , पिंटू ठाकूर ,किरण महाजन, अजय नागराणी , सर्व नगरसेवक नगरसेविका , जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी सभापती सुनील महाजन , ज्ञानदेव झोपे , प्रीती पाटील, संगीता बियाणी , दिपाली ब-हाटे , रोहिणी पाटील , चेतना भीरूड , सरपंच नगरसेवक गणेश धनगर, वंदना उन्हाळे , महेंद्र ठाकुर यांचेसह शहरातील व्यापारी व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या नयन रम्य सोहळयात छत्रपती शहाजी महाराज यांच्या लग्नाचा संजीव देखावा झाला नंतर मुघलांनी मराठी साम्राज्यावर केलेले अन्याय दाखविण्यात आले
आई जिजाऊ मातेच्या पोटी बाळ शिवाजी महाराज यांचा जन्म , नंतर शिवाजी महाराज यांची मावळे सेना तयार झाली आणि मैदानी शिक्षण झाले ,
महिलां वरील अत्याचार थांबविन्या साठी मुघल सेने वर हल्ला , तसेच महादेवास करंगळी कापून रक्ताभिषेक करुंन स्वराज्य स्थापनेची व संरक्षण करायची शपथ घेतल्याचे रोमहर्षक दृश्य
एक एक करीत गड जिंकले शत्रुना चारी मुंडयाचित करुंन पराक्रम गाजविला .
नंतर अफजल खानाचा वध करुन विजय मिळवला
आई जिजाऊ यांनी शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक झाला पाहिजे म्हणुन सांगितले. असता गागा भट्ट यांचे मार्गदर्शनखाली शिवाजी महाराज यांचा
भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा झाला यावेळी सर्व श्रोते प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते . सनई चौघडे व तुतारींच्या गजरात फटाक्यांची आतषबाजीत नयनरम्य असा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला .तर डॉ भाग्यश्री भंगाळे व गृप ने नृत्य सादर करुंन महाराजांना मानवंदना दिली नीप्रतिष्ठा महिला मंडळ यांनी आयोजित कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांनी स्वत: बहारदार खुमासदार शैलीत ध्वनीमुद्रित आवाजाचे सादरीकरण केले . सुरेख मांडणी होती
जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम असा झाला ज्यात शहरातील सर्व स्थानिक कलाकार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते .
शिवराज्याभिषेकाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याच्या प्रतिक्रिया प्रसंगी शाहरवासियानी व्यक्त केल्या
शहरात पार पडलेल्या या सोहळ्याची शान वेगळीच होती. शिवप्रताप दर्शविणाऱ्या कलाकारांच्या मागे भुसावळचे आमदार होते आमदारांची शब्दफेक खरंच एखाद्या डबिंग आर्टिस्टला आव्हान देणारी होती. तर जिजाऊ मासाहेबांची भूमिका सौभाग्यवती रजनी संजय सावकारे यांनी ताकदीने उभी केली, व्वा क्या बात है. दोघेही पती-पत्नीचे शिवछत्रपती प्रतींचे प्रेम आणि श्रध्दा पाहून उपस्थित भारावले. एकदाही रंगमंचावर न आलेल्या प्रतिष्ठा महीला मंडळातिल महिला माता भगिनिंचे करावे तेवढे कौतुक कमी. हिंदवी स्वराज्य निर्माते, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज
यांचे समग्र जिवनचरित्र सजिव स्वरुपात आबाल वृद्ध पुरुष व महिलानी सादर केले . पराक्रमी
राजांचा इतिहास यानिमित्ताने सर्वांसमोर पुन्हा जिवंत झाला
संपूर्ण वातावरण भगवे झाले. महाराजांचा संघर्ष आणि रयते प्रतीचे व्यवस्थापन खरंच वर्तमानातील अनेक प्रश्नांची उत्तरे देत होते. शहरातील कलावंतांनी महानाट्य उभे करण्याची बहुदा ही नांदी असावी. आमदार संजय सावकारे व प्रतिष्ठा महीला मंडळाचे हार्दिक आभार. प्रतिष्ठा महीला मंडळाने मराठी जनांची प्रतिष्ठा सर्वांना दाखवून दिली.
दरम्यान राज्याभिषेक दिन सोहळा या पार्श्वभूमीवर किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचां निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेत एकूण १७ उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली .
प्रा राजश्री देशमुख यांनी अतिशय सुंदर दिलखुलास असे सूत्रसंचालन करून रसिक प्रेक्षाकाची मने जिंकली .
आभार आणि मनोगत
आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले . यशस्वितेसाठी प्रतिष्ठा महिला मांडळ सर्व पदाधिकारी सदस्या , यांचे सह कलाकार यांनी परिश्रम घेतले .