भुसावळ मधे प्रथमच इस्कॉन मंदिरामध्ये 300 किलो आंब्याचा भोग अर्पण व आंबावन महामहोत्सव साजरा

भुसावळ – आंब्याच्या या ऋतूत कृष्ण भक्तांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून भगवान कृष्णा च्या संपूर्ण मंदिराला एक घनदाट आंब्यांच्या वनामध्ये परिवर्तित करून भगवान कृष्णासाठी मधुर हरिनाम संकीर्तन सहित आंब्याच्या शास्त्र पुराणातील मधुर कथा व महाआरती नंतर सुमारे 350 भक्तांना आंब्याच्या रसा सहित संपूर्ण स्वादिष्ट महाप्रसादाचे वाटप केले

स्व:त भगवान कृष्ण भगवत गीता 9 व्या अध्यायात 26 व्या श्लोकात पवित्र संदेश देतात” पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति” प्रेमाने जर मला पत्र, पुष्प, फळ व पाणी प्रेमाने अर्पण केले तर मला ते खूप प्रिय आहे..

चैतन्य महाप्रभु जे कलियुग मध्ये 500 वर्षा पुर्वी साक्षात राधा कृष्ण चे रूप घेवून कृष्ण भक्तीच्या प्रचार साठी अवतरले . त्यांनी सुद्धा त्यांच्या लीला मध्ये पश्चिम बंगाल मधील नवदीप मध्ये हीच आमवन संकल्पना निर्माण करून भक्तांना अति रसाळ आंब्याच्या महाप्रसादाचे आनंद दिला..त्याच लीलाचे स्मरण करून ही संकल्पना भुसावळ मध्ये दर वर्षी साजरा करण्याचे भक्तांनी संकल्प केला.

या आंबा महामहोत्सव मध्ये 100 किलो रत्ना हापुस, 100 किलो केसर व 100 किलो बदाम आंब्याचा भोग दाखवून सर्वांसाठी महाप्रसाद म्हणुन भक्तांना वाटप केले. हा महामहोत्सवा साठी इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष श्रीमान रासयात्रा प्रभु, जितेंद्र प्रभु, श्रवणार्नंद प्रभु व सहकारी भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.