भुसावळ – भुसावळ तालुक्यातील खड़का येथील सरपंच यांच्या मुलगा तथा रिपााई चे युवा जिल्हाध्यक्षावर बुधवार रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची घटना येथे घडली .
तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या सरपंच यशोधरा देविदास तायडे यांचे पुत्र तथा रिपााई चे युवा रिपााईचे युवा जिल्हाध्यक्षा गिरीष तायडे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एम.आय.डी. सी.परिसरात कोणीतरी अज्ञाताने चाकूने निर्दयीपणे वार केल्याने त्यास रक्ताने माखलेल्या अवस्थेत भुसावळ शहरातील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.मारेकऱ्याने चाकुचे सहा वार केल्याने गिरीश तायडे रक्ताच्या थारोळयात पडले होते .
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान। घटनास्थळी त्वरित तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड सह कर्मचारी दाखल झाले होते .



