वरणगाव –
कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांमध्ये पठारावस्था आलेली आहे मोबाईल व विविध मोबाईल मधील गेम्स मध्ये विद्यार्थी अडकले आहेत त्यांच्यामध्ये लेखनाचा सराव कमी झालेला आहे तसेच गणित व विज्ञान विषयाकडे देखील रुची कमी झाल्याने या विषयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गणित विज्ञान विषयाचे विविध उपक्रम घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न असणार त्याचे प्रतिपादन आदर्श सिंधी हायस्कूलचे नूतन मुख्याध्यापक विजय मंगलानी यांनी केले
भुसावळ येथील आदर्श सिंधी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्याम टीलवानी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी उपशिक्षक व बालभारती मंडळाचे सदस्य विजय मंगलांनी यांची पदोन्नती होऊन संस्थेने मुख्याध्यापक पदी नियुक्त केले यावेळी ते बोलताना म्हणाले की श्याम टीलवानी सरांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांमधील विविध अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयीची रुची वाढवली तेच गुण हेरून व नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना विकसित करण्यासाठी आम्ही शिक्षक वर्गाच्या वतीने प्रयत्न केले जातील तसेच गणित व विज्ञान विषयातील क्लिष्ट संकल्पना समजून घेण्यासाठी प्रात्यक्षिकावर भर दिला जाईल व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे यासाठी विविध संस्थांची मदत देखील घेईल विजय मंगलानी यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा गौरव करण्यासाठी नेहरू विद्यामंदिर तळवेल चे मुख्याध्यापक एस एस अहिरे ईबटा संघटनेची जिल्हाध्यक्ष आर आर धनगर माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी संचालक डॉ. संजीव भटकर एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे व्हाईस चेअरमन सुनील वानखेडे आदी उपस्थित होते



