भुसावळ रेल्वे विभागाच्या सिनीयर डीसीएमपदी धीरेंद्रसिंग –

भुसावळ : भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांची मुंबईत पीआरओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी मुंबई येथून धीरेद्रसिंग यांची नियुक्ती झाली आहे.
ते सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. डॉ.मानसपुरे हे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार मुंबईत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.