व्हॉइस ऑफ मीडियाच्या व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम तर्फे शिरखुर्मा पार्टीचे आयोजन

जळगाव – मेहरून येथे व्हॉइस ऑफ मेडिया व नैसर्गिक मानाजी का सुरक्षा परिषद फोरम च्या वतीने ईद निमित्त शीरखुर्मा पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयसीआयसी बँकेचे मेन ब्रांच मॅनेजर देवेंद्र वाघ होते, यावेळी मान्यवरांना डॉ शरीफ बागवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आयसीआयसी बँकेचे ब्रांच मॅनेजर देवेंद्र वाघ यांना बेस्ट मॅनेजर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , आय सी आय सी बँकेचे डेप्युटी मॅनेजर प्रशांत दिलीप श्रावगी यांना पण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,तसेच कोरोना कांलमध्ये उत्तम कार्य करणारे डॉ. रमाकांत कदम कोरोना वीर प्रमाणपत्र देऊन डॉ, कमलाखी सरकार ,व डॉक्टर संदीप सपकाळे यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया समन्वय व नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी माहिती देताना डॉ शरीफ बागवान सामाजिक कार्यकर्ते यांनी व्हॉइस ऑफ मीडिया शी जोडण्याकरिता असे अनेक कार्यक्रम घेण्यात येईल व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे कार्य संपूर्ण भारतामध्ये पसरवून भारताचा प्रत्येक गावातील नागरिकाला जोडणार असल्याचे म्हटले आहे प्रत्येक पत्रकाराला संघटनेशी जोडण्यात येईल व त्यांचे हक्कांसाठी लढा उभारण्यात येईल असे या प्रसंगी म्हटले, या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी आयसीआयसी बँकेचे ब्रांच मॅनेजर देवेंद्र वाघ होते. या शीरखुर्मा पार्टीला सर्व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तींची उपस्थित होती. यावेळी डॉ, जाहीर शाह, समाधान जाधव , ईश्वर वंजारी, श्रावण चव्हाण, एकनाथ पाटील, सुरेश मराठे, राजेश शिंदे, योगेश वंजारी, किरण वाघमाने, डॉ, किरण जाधव, इंजिनिअर महेश पाटील. समीर सलीम फरहान शरीफ नाझीम निसार, राकेश लोहार अश्फाक अलीम, गणेश सोनार ,इरफान रउफ, अल्ताफ अलीम, अमीन निसार ,आबिदअली,सय्यद,
इलियास खान, आदी उपस्थित होते.