भुसावळ – डॉ.आर.ए. माशेलकर वैज्ञानिक आणि महासंचालक – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) भारत सरकार,यांच्या हस्ते सुफियान पटेल यांला” डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इग्निटेड माइंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड्स 2022″ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम अहमदाबाद येथे ०८ मे रोजी पार पडला. सुफीयान हा
ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता ७ वीत शिकत आहे. यावेळी वैज्ञानिक डॉ.आर.ए. माशेलकर यांच्या हस्ते सुफीयान यास गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा virtually / online पार पडला. आठ हजार दोनशे दोन विद्यार्थीनी यात भाग घेतला होता.भारतातून दहा विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यात महाराष्ट्रातून सुफियान हा एकमेव आहे.
सोसायटी फॉर रिसर्च अँड इनिशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज अँड इन्स्टिट्यूशन्स (SRISTI) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांनी हि राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती.
या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये
सुफियान पटेल यांने “माउथ ऑपरेटेड व्हॅक्यूम पेज टर्नर” दोन्ही हातांनी अपंग व्यक्ती साठी उपयुक्त इनोव्हेशन विकसित करण्यासाठी”डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाइट अवॉर्ड-2022″ पुरस्कार प्रदान करण्यात आले
हा इनोव्हेशन म्हणजे “माउथ ऑपरेटेड व्हॅक्यूम पेज टर्नर” वरच्या अंगातील विकृती असलेल्या लोकांसाठी,दोन्ही हातांच्या अपंग व्यक्तींसाठी सुफियानचा नवोपक्रम खूप उपयुक्त ठरेल. वरच्या अंगाच्या विकृतीने ग्रस्त असलेल्या लोकांना पुस्तकाची पाने उलटण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते,या कारणाने ते सहसा शिकण्यापासून वंचित राहतात. हे साधन”Mouth Operated Vacuum Page Turner’’ वरच्या अंगाशी संबंधित विकार असलेल्यांना पुस्तकाची पाने पलटवणे सोपे करेल. हे उपकरण दिव्यांग व्यक्तींना पुस्तकाची पाने उलटण्यात,फिरवण्यात मदत करेल. आणि असे अपंग लोकांना पण आपले शिक्षण पूर्ण करता येईल.
या पुरस्कारा बद्दल त्याचे ताप्ती पब्लीक स्कुलच्या प्रिंसीपल निना कटलर व इतर शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.


