पुण्याच्या हडपसर भागात एका वाहनातून कोट्यवधी रुपये पोलिसांनी केले हस्तगत….! अबब कोट्यवधी रुपये मिळून आल्याने एकच चर्चा ..!

पुणे – पुण्यातील हडपसर परिसरात पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या बॅगा पकडल्या आहेत. पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्रजवळ पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने ही धडक कारवाई केली आहे.

यावेळी पोलिसांनी नोटा मोजण्याच्या मशिन्स देखील जप्त केल्या आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.यावेळी पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २२० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पोलिसांना ब्रिझा गाडी क्र. एम.एच. १३ सी के २१११ एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यावर पोलिसांनी त्याला गाडी साइडला घ्यायला लावून त्याच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी त्या डिकीत काही बॅगा संशयास्पद रित्या आढळून आल्या. बॅग उघडून पाहिले असता त्यात नोटांचे बंडल यावेळी दिसून आले. त्यानंतर गाडीसह चालकाला पोलिस स्टेशन ला आणण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.