भुसावळ – येथिल विद्युत लोको शेड मध्ये महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्युत लोको शेडचे मुख्य विद्युत अभियंता हिमांशू रामदेव यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतीमेला माल्यार्पण केले. यावेळी हिमांशू रामदेव यांनी शेड मधील कर्मचाऱ्यांना महाराणा प्रताप यांच्या जिवणावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगीतले की महाराणा प्रताप हे पराक्रमी योद्धा होते. त्यांनी हल्दी घाटी मध्ये दुश्मनांना ठार केले आहे. त्यांच्यामुळे आज आपण चांगले जिवन जगत आहे. रेल कामगार सेनेचे ललीत मुथा,एनआरएमयु चे ललीत भारंबे, एस टी एसी सी युनियन चे चेतन तायडे,सी आर एम एस चे नरेन्द्र कोटूरवाल,ए बी सी युनियन चे राजू वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. महाराणा प्रताप जयंती समीती मधील रणजीत चौधरी यांनी महाराणा प्रताप यांच्या जिवणाचा पाढा वाचला. यावेळी मुख्य विद्यूत अभियंता हिमांशू रामदेव,मंडळ विद्युत अभियंता सौरभ गोयल, सहाय्यक मंडळ अभियंता सिरीन संचय,राहुल मिश्रा,अभियंता राजेश भारंबे,महेश काळे,एस पी भानदुर्गे,जिवन भोळे,नीलेश जोशी,मुकेश चौधरी,अरविंद रायकवाड सह शेड मधील अजय महाजन,रंजीत चौधरी,ललित चौधरी,राजीव कुमार सिंह,नितीन परदेशी,सुधांशु कुमार,यश राजपूत,लक्ष्मण चौधरी,आयुश सिंग,भूषण सिंग,जशवंत सिग,सुधीर कुमार,
संतोष सिंग,मोहन सिंह,रुपसिंग पाटिल,लाखन सिंह,सुरेश सिंग,रविराज सिंग,नयन सिंग, राहूल राजपूत, आशीष सिसोदिया व
अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.सुत्र संचालन मुन्सफ अली यांनी तर आभार रणजीत चौधरी यांनी मानले. भुसावळ रेल्वेच्या विभागात प्रथमच असा मोठा कार्यक्रम घेतला गेला.



