भुसावळ स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने तीन दिवसीय भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग संपन्न :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने तीन दिवसीय भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. स्थानिक कमल गणपती हॉल शांतीनगर भुसावळ येथे दिनांक 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2023 पर्यंत आयोजित प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील अमर यादव यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण देऊन कराटे बद्दल अनमोल मार्गदर्शन केले व वेगवेगळे प्रात्यक्षिके करून घेतली.
कराटे या स्वयंरक्षा तंत्रातील चार डिग्री ब्लॅक बेल्ट असणारे अमर यादव प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक व तंत्रज्ञ आहेत या प्रशिक्षण वर्गाचे मध्ये त्यांनी सांगितले की कराटे कला तंत्र अवगत करणे म्हणजे एक आयुष्यभराची तपश्चर्या असते मानसिक व शारीरिक दृष्टीने व्यक्तीला सक्षम बनवणारी निर्भय व आत्मनिर्भर बनवणारे हे एक तंत्र आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य नितीन उपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुलांनी वाईट व्यसनांकडे न जाता खेळ व कराटेचे प्रशिक्षण घेऊन आपलं शरीर सदृढ ठेवून पालकांचे व देशाचे नाव मोठ करावे.
यावेळी स्पर्धे दरम्यान पंच कमिटी तथा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनमोल सहकार्य दिले त्याबद्दल कराटे प्रशिक्षक बापू हजबंन सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
शेवटी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व स्पर्धेमध्ये फर्स्ट सेकंड व थर्ड क्रमांक पटविणारे सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि वेगवेगळे बेल्टचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी भुसावळ शहर व पंचक्रोशीतील सर्व कराटे प्रशिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .